कळी!
निर्माल्याची व्यथा वेगळी होती
फुलावयाची हौस आंधळी होती
ना गजरा केला कोणी
ना अर्पियली देवाला
ना मुले वेचण्या आली
ना दिले कुणी प्रेताला
जगण्याचे मग कारण काय म्हणावे
या चिंतेने ती व्यापून सगळी होती
सुटले ना कोडे तिजला
सुकली ती विचार करुनी
मग वारा आला जेंव्हा
क्षणभरात गेली उडुनी
जगण्याला ना अर्थ लाभला साधा
प्रश्नांची ती एक साखळी होती
4 comments:
tujhya kavita vachlya...chaan hotya he vegla sangaychi garaj nahi i gues...far avadlya....
but one thing...mostly saglyach kavitan madhey...ek udasinata janavli...mebe m wrong...but i cud preceive thm tht way....
thode negative vibes aahet...dukkha..virah..arth virahit jeevan...gupit...rahasya...etyadi....me chuk asenahi kadachit...pan mala je janavla te sangitla me...i hope u dont mind...
छान !!! मला वाटतं निर्माल्याचां उल्लेख "ते" निर्माल्य असं करतो ना आपण? इथे "ती"आलंय का?
वैभव, आपण ते निर्माल्य असंच म्हणतो. पण दुसरं कडवं निर्माल्याला उद्देशून नाहीये, ते कळीला उद्देशून आहे. आणि तीचे रुपांतर निर्माल्यात कसे झाले ते दाखवले आहे.
Post a Comment