नीज
दाही दिशा झाल्या
अंधाराने ओल्या
डोळ्यांत रंगले
स्वप्नांचे बंगले
अंगणात आले
चांदण्यांचे झुले
अंगभर धूर
मनात काहूर
पापण्यांचे गूज
डोळ्यांवर नीज
काही काही गोष्टी घडतात, आणि काळजात आपलं हक्काचं घर करून जातात. अशाच आठवणी टिपता टिपता वेळ निघून जाते आणि उरतं फक्त चिरकालाचं देणं. त्याच काही गळून गेलेल्या पानांना आणि निघून गेलेल्या क्षणांना हे एक देणं प्राजक्ताचं ...
दाही दिशा झाल्या
अंधाराने ओल्या
डोळ्यांत रंगले
स्वप्नांचे बंगले
अंगणात आले
चांदण्यांचे झुले
अंगभर धूर
मनात काहूर
पापण्यांचे गूज
डोळ्यांवर नीज
लेखन: सारंग पतकी तारीख: 24.1.07
वर्गिकरण कविता, मात्रा वृत्त
No comments:
Post a Comment