24.1.07

जाण

जो जाणेना अन जाणेना, की जाणेना काही
तो मुर्ख तयाला जाण कशाची कधीच आली नाही!

जो जाणे पण ना जाणे की तो जाणे काही;
जागवा तयाला जाण करून द्या पकडून दोन्ही बाही!

जो जाणेना पण हे जाणे की तो जाणेना काही
तो मनुष्य आहे शुद्ध त्यामध्ये सखा जवळचा पाही!

जो जाणे अन हे जाणे की तो जाणे सगळे काही;
मानले गुरु मी त्याला माझा देव त्यामध्ये राही!

3 comments:

coolkarni said...

ikade takli he changle kele...loved to read it again.

Kamini Phadnis Kembhavi said...

तो मनुष्य आहे शुद्ध त्यामध्ये सखा जवळचा पाही>>>आवड्ल :)

प्रशांत said...

सुरेख कविता.