20.1.07

कविता

आज ठरवूनच निघालो
म्हटलं शोधूच आज तिला,
माझ्या लाडक्या कवितेला!
मग सगळ्या ठरलेल्या जागा,
सगळ्या संकेतस्थळांना
एक वळसा मारून वर्तुळाकार...
पुन्हा सुरुवात केली तिथेच येऊन थांबलो...
हताश, उदास, एकलकोंडा नेहमीप्रमाणे...

मला अजूनही कळालेलं नाहीये
की परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही!

5 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते>>>
वाह!!!

coolkarni said...

Zabardast!!

Unknown said...

>>>परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही!<<<
vaa!! kyaa baata hai!!

जयश्री said...

सारंग, प्राजक्ताने सुरवात जबरदस्त केली आहेस. प्राजक्ताचं फुल सुद्धा इतकं टवटवीत आहे ना....अगदी तुझ्या कवितेसारखं!!

केंद्रबिंदूशी फ़क्त नातं सांगता येतं..... ultimate!!

वैभव जोशी said...

परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही!

हंSSSSSSSS

बाकी बोललो आहोतच