निरोप
अधरावर थरथरत्या
बोल निरोपाचा ये
काठावर नयनांच्या
थेंब वियोगाचा ये
त्यावेळी जुळव नवे
काव्याचे धुंद थवे
उडवून दे त्यांनाही
कातरल्या संध्येला
काही काही गोष्टी घडतात, आणि काळजात आपलं हक्काचं घर करून जातात. अशाच आठवणी टिपता टिपता वेळ निघून जाते आणि उरतं फक्त चिरकालाचं देणं. त्याच काही गळून गेलेल्या पानांना आणि निघून गेलेल्या क्षणांना हे एक देणं प्राजक्ताचं ...
2 comments:
.... हे एक देणं प्राजक्ताचं ...>>>>इथुनच जिंकायला सुरवात झाली की... :)
Shabdrachana Apratim re Saranga!!
Sahich re!!
Post a Comment