बाजार
मुर्खांच्या बाजारी
मुर्खांना मोल उरे
कचऱ्यासम रस्त्यावर
फेकुन देतात हिरे
मग आता का रुसणे?
का अन हे हिरमुसणे?
विसरून हे क्षुद्र खेळ
मौनातच रमवी मन !
काही काही गोष्टी घडतात, आणि काळजात आपलं हक्काचं घर करून जातात. अशाच आठवणी टिपता टिपता वेळ निघून जाते आणि उरतं फक्त चिरकालाचं देणं. त्याच काही गळून गेलेल्या पानांना आणि निघून गेलेल्या क्षणांना हे एक देणं प्राजक्ताचं ...
1 comment:
अगदी खरय!!
पण शहाण्यांच्या मोनामुळेच मुर्खांच फावत या जगात, खर ना!!!!
Post a Comment