6.2.07

कळून आले

शब्दांचे बाण विषारी,
सुटल्यावर कळून आले
जगणे अवघड नव्हते,
मेल्यावर कळून आले

ज्यासोबत जगावयाची
मज सवय लागली होती
ते दुःखही माझे नव्हते
हसल्यावर कळून आले

उधळून टाकले ज्याला
मी फुलापरी तुजवरती
ते हृदय काच होते हे
तुटल्यावर कळून आले

कधी तुला रडू येईल का?
मज खरेच वाटत नव्हते
अंदाज चुकीचा नव्हता
गेल्यावर कळून आले

जगणे तर ओझे होते
मरणेही ओझे झाले
मी ओझे होतो नुसते
नेल्यावर कळून आले


तो डाव हातचा मीही
हसता हसता हरलो
जिंकणेच सोपे असते
हरल्यावर कळून आले

4 comments:

Vaishali Hinge said...

तुझा blog छान आहे.
रंग्संगती आवडली.
लिखाण पण आवडल..

Kamini Phadnis Kembhavi said...

आहा...

वैभव जोशी said...

मस्त ! शेवटचं कडवं खास

coolkarni said...

ekdam jabrat...