जखम
कोरा कागद दिसला
की काहीतरी खरडणं होतं
जुन्याच जखमांना मग
नव्याने भरडणं होतं
काही काही गोष्टी घडतात, आणि काळजात आपलं हक्काचं घर करून जातात. अशाच आठवणी टिपता टिपता वेळ निघून जाते आणि उरतं फक्त चिरकालाचं देणं. त्याच काही गळून गेलेल्या पानांना आणि निघून गेलेल्या क्षणांना हे एक देणं प्राजक्ताचं ...
कोरा कागद दिसला
की काहीतरी खरडणं होतं
जुन्याच जखमांना मग
नव्याने भरडणं होतं
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
7.2.07
0
प्रतिक्रिया
भस्म लावले अंगाला
अन फिरू लागलो उघडा
रोज पु्जिले जे देवाला
त्यास म्हणालो झगडा!
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
24.1.07
0
प्रतिक्रिया
ही जी सगळी गुपीतं असतात ना
त्यांचही एक खास गुपीत असतं
दुसऱ्या कुण्णाला कळू द्यायचं नाही
म्हणताना सगळ्यांनाच सांगितलेलं असतं.
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
20.1.07
3
प्रतिक्रिया
नारळीच्या जाळीतून
चंद्र किती नाजूक दिसतो!
पण तो दिसतो तसा नसतो
नेमक हेच समजायला मी फसतो!!
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
20.1.07
1 प्रतिक्रिया
दोन अधीक दोन उणे
सगळं करून पाहिलय
आयुष्याच गणित मात्र
अपुर्णांकात राहिलय
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
19.1.07
2
प्रतिक्रिया
एकाच नाण्याला दोन बाजू असतात
हे जर तुला कळलं असत
माझ्यापासून दूर जाणारं पाऊल
अखेर माझ्याकडेच वळलं असत
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
19.1.07
0
प्रतिक्रिया