दुःख
केवढे हे जीवघेणे दुःख असते
आसवे डोळ्यात अन ते मख्ख असते!
वाहतो मातीच माती दुःख वेडा
शेवटाची वात जैसी लख्ख असते!
काही काही गोष्टी घडतात, आणि काळजात आपलं हक्काचं घर करून जातात. अशाच आठवणी टिपता टिपता वेळ निघून जाते आणि उरतं फक्त चिरकालाचं देणं. त्याच काही गळून गेलेल्या पानांना आणि निघून गेलेल्या क्षणांना हे एक देणं प्राजक्ताचं ...
केवढे हे जीवघेणे दुःख असते
आसवे डोळ्यात अन ते मख्ख असते!
वाहतो मातीच माती दुःख वेडा
शेवटाची वात जैसी लख्ख असते!
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
6.2.07
0
प्रतिक्रिया
वर्गिकरण अक्षरगण वृत्त, कविता, रुबाई
नवीन वाट शोधुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
मधेच सागरात शीड फाटले जरी
खुळे प्रयास वादळात आटले जरी
नवीन श्वास घेउनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
प्रलोभनात पाडतील ही सुखे जरी
सदैव हात जोडतील ऐहिके तरी
क्षणैक मोह टाळुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
रणात श्वास थांबलेच आजला जरी
तुला न ध्येय साधलेच आजला तरी
नवा विचार ठेवुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
लेखन:
सारंग पतकी
तारीख:
31.1.07
1 प्रतिक्रिया
वर्गिकरण अक्षरगण वृत्त, कविता