विठुराया
वेडी तुझी माया । देवा विठुराया ।
पडतो मी पाया । मायबापा ।।
मन सैरभैर । त्याला नसे ठाव ।
तूच रस्ता दाव । नारायणा ।।
विनवितो तुला । देवा पांडुरंगा ।
मनातला दंगा । थांबवावा ।।
उजळून जावो । अंतर्बाह्य मन ।
सगुण निर्गुण । एक होवो ।।
विचारांच्या पुढे । देवा तुझी गती ।
पामराची मती । गुंग झाली ।।